परीक्षेचा आराखडा
| अ.क्र. | पेपर क्रमांक | गुण | कालावधी | मानक | माध्यम | पेपर चे स्वरूप |
|---|---|---|---|---|---|---|
| १ | पेपर १ (अनिवार्य) | २०० | २ तास | पदवी | मराठी / इंग्रजी | वास्तुनिष्ठ / बहुपर्यायी |
| २ | पेपर २ (अर्हताकारी) | २०० | २ तास |
घटक १ ते ५: पदवी स्तर घटक ६: दहावी स्तर घटक ७: दहावी आणि बारावी स्तर |
मराठी / इंग्रजी |
टीप:
१) पेपर क्रमांक २ मध्ये किमान ३३ टक्के गुण आवश्यक.
२) पेपर २ मध्ये ३३ टक्के गुण प्राप्त उमेदवाराची पेपर १ च्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking)
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण गुणांमधून १/४ गुण कमी करण्यात येतील.
- उमेदवाराने एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिल्यास किंवा उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, तर १/४ गुण एकूण गुणांमधून वजा केले जातील.
- प्रश्न सोडवला नसेल तर त्या प्रश्नाला नकारात्मक गुणपद्धती लागू नसेल.
- गुणांची बेरीज अपूर्णांकात येत असेल तर ती अपूर्णांकातच राहील.
अपवाद: पेपर १ आणि पेपर २ मधील "निर्णय घेण्याची क्षमता" (Decision Making) आणि "समस्या सोडवणे" (Problem Solving) या प्रश्नांना नकारात्मक गुणपद्धती लागू नाही.
अभ्यासक्रम पेपर १ (General Studies) - २०० गुण
| अ.क्र. | विषय |
|---|---|
| १ | राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी |
| २ | भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ (महाराष्ट्राच्या भारांशासह) |
| ३ | महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल (प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक) |
| ४ | भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन (संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण) |
| ५ | आर्थिक व सामाजिक विकास (शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम) |
| ६ | पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल (यावरील सर्वसाधारण प्रश्न) |
| ७ | सामान्य विज्ञान |
पेपर २ (CSAT) - २०० गुण
| अ.क्र. | विषय |
|---|---|
| १ | आकलन (Comprehension) |
| २ | संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य |
| ३ | तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता |
| ४ | निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण |
| ५ | सर्वसाधारण मानसिक क्षमता |
| ६ | मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, इयत्ता दहावी स्तर), विदा अनुयोजन (तक्ता, आलेख, इयत्ता दहावी स्तर) |
| ७ | मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी स्तरावरील) |
महत्त्वाच्या टिप्स
- इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता, मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल.
- प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.
- मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. दोन्ही पेपरला उपस्थित न राहिल्यास उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही.